सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये भयंकर घटना
२० वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार
दोन मित्रांनी विद्यार्थिनीसोबत केलं भयंकर कृत्य
लॉजवर नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला
सांगलीमध्ये इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सांगली हादरली. विद्यार्थिनीच्या दोन मित्रांनीच हे भयंकर कृत्य केले. विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. ऐवढ्यावर न थांबता आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. तिने न घाबरता पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली तर दुसऱ्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन, शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. शिक्षणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या ईश्वरपूर परिसरात या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मूळची सातारा जिल्ह्यातील असलेली ही तरुणी ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी तिच्या मित्रांनी तिला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेथे तिला जाळ्यात ओढून शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले त्यानंतर तिच्या इच्छेविरोधात जाऊन तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी तिला मारहाणही केली. प्रकरणी पीडित तरुणीने हिंमत दाखवून थेट ईश्वरपूर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ सामूहिक बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका आरोपीला अटक केली. तर दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. डी. ताम्हाणे करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.