Sangli Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Accident News: भरधाव पिकपच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीत अंत; संतप्त जमावाने पिकप टेम्पोची तोडफोड केली

Accident News: मिरज शिरोळ मार्गावरील लक्ष्मी मंदिरासमोर पिकप वाहनाने थांबलेल्या चार चाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने चार चाकी वाहनातून उतरत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील- साम टीव्ही प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मिरजहून शिरोळाकडे जाणाऱ्या वाहनाला भरधाव पिकपने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास माळी (वय २) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पिकअप टेम्पोची जोरदार तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार मृत चिमुकला हा लक्ष्मी मंदिर(temple) घाट परिसरात आपल्या कुटुंबियासोबत राहतो. शनिवारी दुपारच्या सुमारास विकास हा आपल्या घराबाहेर खेळत होता.

त्यावेळी शिरोळकडे जाणाऱ्या एक भरधाव वेगात पिकअप आला. क्षणार्धात या पिकअपने विकासला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की विकास फुटबॉलसारखा हवेत उडाला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू(death) झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला.

यानंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत पिकअप वाहनाची तोडफोड केली. अपघाताची (Accident )माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विकासचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पिकअपचालक फिरोज मोमीन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT