Ahmednagar Accident News: अरणगाव - सोलापूर रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात! २ जण जागीच ठार, २ गंभीर जखमी

Ahmednagar Breaking News: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सांगोल्यामध्ये भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज नगरमध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
Ahmednagar Accident News: अरणगाव - सोलापूर रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात! २ जण जागीच ठार, २ गंभीर जखमी
Ahmednagar Breaking News:Saamtv

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. २२ जून २०२४

अहमदनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अरणगाव - सोलापूर बायपासवर ट्रेलर, ट्रक आणि कार अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Ahmednagar Accident News: अरणगाव - सोलापूर रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात! २ जण जागीच ठार, २ गंभीर जखमी
OBC Protest: 'विधानसभा निवडणुकीत नेत्यांना गावबंदी करू', बीडमध्ये ओबीसी बांधव आक्रमक; मुंडन करून केला सरकारचा निषेध |VIDEO

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. आज अहमदनगरच्या अरणगाव - सोलापूर बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रेलर आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. अशातच एक कारही मागून येऊन धडकली. या अपघात इतका भीषण होता की ट्रेलर आणि ट्रकच्या दोन्ही ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील दोघे जण जखमी झालेत. अपघातातील जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News: अरणगाव - सोलापूर रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात! २ जण जागीच ठार, २ गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar Crime: दिवसाढवळ्या बँक मॅनेजरच्या घरात चोरी, अवघ्या वीस मिनिटात ९ तोळे सोने लंपास; CCTV Footage समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com