Factory Boiler Blast : मध्यरात्री भीषण अग्नितांडव! कारखान्यातील बॉयलरचा स्फोट; २ कामगारांचा मृत्यू

Factory Boiler Blast in gurugram : गुरुग्राममध्ये कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्यरात्री भीषण अग्नितांडव! कारखान्यातील बॉयलरमध्ये स्फोट; २ कामगारांचा मृत्यू
Factory Boiler Blast :Saam tv

हरियाणा : दिल्लीजवळील गुरुग्राम शहरातील कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी झालेल्या कारखान्याच्या बॉयलरचा शुक्रवारी मध्यरात्री स्फोट झाला. या घटनेत २ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर काही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मध्यरात्री भीषण अग्नितांडव! कारखान्यातील बॉयलरमध्ये स्फोट; २ कामगारांचा मृत्यू
Dhule Fire News : भल्या पहाटे शेतकऱ्यावर ओढवले संकट; गोदामाला आग लागून बियाण्यांसह खत, शेतीपयोगी साहित्य जळून खाक

कारखान्यातील भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारती हादरल्या. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या हादऱ्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. स्फोटाच्या आवाजामुळे लोक घरातील बाहेर पडले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. घटनेच्या माहितीनंतर अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी पोहोचले.

गुरुग्राम शहरातील कारखान्याच्या बॉयलरमध्ये मध्यरात्री अडीच वाजता स्फोट झाला. त्यानंतर सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु होतं. पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. कारखान्यात बॉयलरचा स्फोट का झाला, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. दुसरीकडे शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौलताबादजवळील गुरुग्राम-द्वारका एक्स्प्रेस वेजवळील कारखान्यात स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट होताच कारखान्यात खळबळ उडाली. स्फोटानंतर कामगार जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. त्यानंतर या कामगारांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलांना माहिती दिली. घटना घडल्यानंतर अग्निशमन दल अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मध्यरात्री भीषण अग्नितांडव! कारखान्यातील बॉयलरमध्ये स्फोट; २ कामगारांचा मृत्यू
Taloja Godown Fire: तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी, Video

या घटनेतील जखमींना कारखान्याकडूनही मदत पुरवण्यात येत आहे. स्फोट झाल्यानंतर शेजारील काही कारखान्यांनाही आग लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com