RSS vs BJP:  
महाराष्ट्र

RSS vs BJP: संघाच्या मुखपत्रातून भाजपला कानपिचक्या; भागवतांनंतर ऑर्गनायजरनं भाजपला सुनावलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू,साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशाची चर्चा अद्याप सुरुए. यावर भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी भाजपला कानपिचक्याही दिल्या. हे कमी होतं की काय संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकात भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत केलेल्या घरोब्यावर संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा लेख लिहिला आहे.

संघाच्या मुखपत्रातून भाजपला आरसा

अनावश्यक राजकारणाचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र

अजित पवारांशी युती केल्यानं भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का

भाजप-शिंदेंकडे पुरेसे बहुमत, अजित पवारांना सोबत का घेतलं?

शरद पवारांच्या पक्षाला अंतर्गत कलहामुळे उतरती कळा लागली असती

‘भगव्या दहशतवादा’चे आरोप करणाऱ्यांना पायघड्या का?

26/11 दहशतवादी हल्याला संघाचे कटकारस्थान म्हणणारे सोबत का?

या घटनांमुळे भाजपनं आपली किंमत कमी करून घेतली

यामुळे संघ स्वयंसेवकांची मनं दुखावली

संघाच्या मुखपत्रात असे तिखट सवाल उपस्थित केल्यानंतर भाजपच्या डिवचण्यासाठी उद्धव ठाकरेंना आयतं कोलित मिळालंय़. त्यामुळे ठाकरेंनीही 'भागवतांचा सल्ला मोदी गांभीर्यानं घेणार का? असा खोचक सवाल केलाय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र संघातील वरिष्ठांच्या संमतीनंच भाजपसोबतच्या युतीचा निर्णय झाल्याचा दावा केलाय.

भाजप अध्यक्ष नड्डा यांनी भाजपला संघाची गरज नसल्याचं विधान केलं होतं. त्यावरही रतन शारदांनी कटाक्ष टाकलाय. संघ आणि भाजप हे वेगळे असून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य हे भाजपचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत. स्वंयसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले असा टोलाही त्यांनी लगावलाय.

महाराष्ट्रात करण्यात आलेला राजकीय चिखल आणि त्याचे निकालात उमटलेले पडसाद हा त्याचाच परिणाम असल्याचं सांगत संघाच्या मुखपत्रानं भाजपचे कान टोचले आहेत. त्यामुऴे आगामी विधानसभेत तरी भाजप मातृसंस्था संघाचं ऐकणार का ? आणि संघाच्या दृष्टीनं केलेल्या चूका सुधारणार का? हेच पाहायचं .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT