NPS Rule: कामाची बातमी! NPS च्या नियमात मोठा बदल; ₹५००० महिन्याला गुंतवा अन् ९२ लाख मिळवा

NPS Rule Change: एनपीएसच्या नियमात बदल झाले आहे, आता तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एनपीएसमधून ८० टक्के रक्कम काढता येणार आहे. तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये गुंतवून ९२ लाख रुपये मिळवू शकतात.
NPS
NPSSaam Tv
Published On
Summary

एनपीएसच्या नियमात बदल

एनपीएसमधून ८० टक्के रक्कम काढता येणार

५००० रुपये गुंतवून ९२ लाख रुपये मिळवा

सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एनपीएसच्या नियमात बदल केले आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंच ऑथोरिटीने कर्मचाऱ्यांसाठी एनपीएसमध्ये बदल केला आहे. आता खासगी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी एनपीएसमधील ८० टक्के रक्कम काढता येणार आहे. २० टक्के रक्कमेची अॅन्युटी करता येणार आहे. यामुळे तुम्हाला पेन्शनदेखील मिळणार आहे. याआधी तुम्हाला ६० टक्के रक्कम काढू शकता येत होती.

NPS
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

एनपीएस योजनेचं कॅल्क्युलेशन (NPS Calculation)

आता या नियमात बदल झाली आहे. यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एक रक्कमी रक्कम जास्त मिळणार आहे. जर तुम्ही ५००० रुपयांच्या गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने दर महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर वर्षाला तुम्ही ६०,००० रुपये गुंतवायचे आहे. यावर सरासरी १० टक्के व्याजदर असं समजून घ्या. जर तुमच्या निवृत्तीचे वय ६० असेल तर अॅन्युटी खरेदी करुन ६ टक्के परतावा मिळेल.

NPS
SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

महिन्याला ५००० रुपये गुंतवून ९२ लाख रुपये मिळवा (Invest 5000 Monthly and Earn 92 Lakh)

या योजनेत जर तुम्ही ३० वर्षांसाठी दर महिन्याला ५००० रुपये गुंतवणूक केली. वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला १.१५ कोटी रुपये मिळतील. यातील गुंतवणूकदार ८० टक्के म्हणजे ९२ लाख रुपये काढू शकतात. तुम्हाला २३ लाखांची अॅन्युटी करावी लागले. यावर जर तुम्ही ६ टक्के परतावा मिळवला तरीही तुम्हाला महिन्याला ११००० ते १२००० रुपयांची पेन्शन मिळू शकते.

NPS
Post Office NSC Scheme: पाच वर्षात फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com