Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ख्रिसमस

ख्रिसमस म्हणजे आनंद, प्रेम आणि शांततेचा सण मानला जातो.२५ डिसेंबरला संपूर्ण भारतात ख्रिसमस उत्साहात साजरा केला जातो.

Christmas Celebration | GOOGLE

चर्चमध्ये विशेष प्रार्थना

२४ डिसेंबरच्या रात्री चर्चमध्ये मिडनाईट मास असते. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात विशेष प्रार्थना आणि कॅरोल्स गायली जातात.

Christmas Celebration | GOOGLE

घरांची सजावट

लोक आपल्या घरांना स्टार, लाईट्स, फुलं आणि ख्रिसमस ट्रीने सजवतात. जणू काहि दिवाळी आहे असेच वाटते.

Christmas Celebration | GOOGLE

ख्रिसमस ट्रीचे महत्त्व

ख्रिसमस ट्री म्हणजे आशा आणि नवीन सुरुवात.ख्रिसमस ट्री रंगीबेरंगी बॉल्स, घंटा, तारे आणि लाईट्सने सजवला जातो. मुलांसाठी ख्रिसमस ट्री हे उत्सवाचे खास आकर्षण असते.ट्रीला गिफ्ट्स सुध्दा लावले जातात.

Christmas Celebration | GOOGLE

सांताक्लॉज आणि गिफ्ट्स

सांताक्लॉज मुलांसाठी काहि तरी गिफ्ट्स आणतो आणि मुलांना खुश करतो अशी परंपरा आहे. शाळा, सोसायटी आणि मॉल्समध्ये सांताक्लॉज बनून लोक दिसतात.

Christmas Celebration | GOOGLE

ख्रिसमस कॅरोल्स

चर्च, शाळा आणि घराघरांत ख्रिसमस कॅरोल्स गायले जातात. गाण्यांमुळे वातावरण अधिक आनंदी आणि प्रसन्न होते. चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

Christmas Celebration | GOOGLE

ख्रिसमसचे खास पदार्थ

प्लम केक, कुकीज, मिठाई आणि विविध पारंपरिक पदार्थ बनवले जातात. शेजारी-पाजारी एकमेकांना केक देतात आणि उत्सव साजरा करतात. प्रत्येक घराघरामध्ये चविष्ट खाण्याची मेजवानी बनवली जाते.

Christmas Celebration | GOOGLE

भारतातील वेगवेगळ्या परंपरा

गोवा, केरळ, मुंबई, कोलकाता येथे ख्रिसमस प्रत्येकाच्या चालीरिती परंपरेनुसार खास पद्धतीने साजरा होतो. चर्चेला सुंदर लाईट्सने सजवले जाते. तसेच जत्रांचे आयोजन केले जाते.

Christmas Celebration | GOOGLE

Christmas Menu : ख्रिसमस पार्टी घरीच करताय? 'हा' पदार्थ जेवणात असायलाच हवा, वाचा रेसिपी

Christmas Menu | yandex
येथे क्लिक करा