Sangali News Saam Tv
महाराष्ट्र

Sangali News: उसतोड कामगारांच्या झोपडीवर चोरट्यांचा डल्ला; झोपडीतून मिठ, मिरची आणि तेल लंपास

Sangali Crime News: या देशात गरीब असणं गुन्हा आहे का? पाठीवरती बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या आणि जगण्यासाठी रोज मर-मर मरणाऱ्या लोकांची किंमत या देशात कवडीमोल झाली आहे का? असा प्रश्न विचारायला भाग पाडणारी एक घटना सांगलीत घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sangali Crime News:

या देशात गरीब असणं गुन्हा आहे का? पाठीवरती बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या आणि जगण्यासाठी रोज मर-मर मरणाऱ्या लोकांची किंमत या देशात कवडीमोल झाली आहे का? असा प्रश्न विचारायला भाग पाडणारी एक घटना सांगलीत घडली आहे.

घरात अठराविश्व दारीद्र्य आहे. घराच्या नावावर जनावरांच्या चाऱ्याने उभारलेलं खोपटंच म्हणावं लागेल. पण त्याच खोपट्यातही आता चोरट्यांनी डल्ला मारलाय. हाडाची काड करुन मजूरीच्या पैश्यांबरोबर चोरट्यांनी काय चोरलंय माहितीये? पोटाचं खळगं भरावं भरावं म्हणून गावातल्या वाण्याकडून विणवण्या करुन आणलेली तेल, मीठ, चटणी आणि मिरची.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सांगतलीतल्या वळवा तालुक्यात घडलीये. उसतोड कामगारांच्या तब्बल 16 झोपड्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय.  (Latest Marathi News)

झोपडीत ठेवलेल्या पेट्यांची चोरट्यांनी कुलपं तोडली आणि त्यातून कामगारांनी जन्मभरचं कष्ट करुन कमावलेलं सोननाणं आणि पैसा लंपास केला. पण इतक्यावरच त्यांचं समाधान झालं नाही, म्हणून झोपड्यात ठेवलेलं तेल, मीठ, मीरचीही चोरट्यांनी लंपास केला. या घटनेनंतर आता गरीबांचं झोपडंही सुरक्षीत नाहीये का? असा प्रश्न विचारला जातोय.

चोरीची आता पोलिस चौकशी करतायेत. पंचनामे होतायेत. चोरट्यांचा तपसाही कदाचित लागेल. पण संध्याकाळी लेकराबाळांच्या पोटाचं खळगं कसं भरावं? असा प्रश्न पिठात पाणी टाकून लेकराला दुध समजून पाजणाऱ्या या माऊलीला पडलाय. कारण निर्दयी चोरट्यांनी ते पिठही सोडलं नाहीये. चोरी झाली हे महत्वाचं तर आहेच. पण ज्यांना जगणं छळतं आणि मरण स्वस्त वाटतं, अशा लोकांनाही नियती कशी काय लुटू शकतात? आता त्यांच्या लेकराबाळांचं काय? हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT