Peacock Dance Video Saam Tv
महाराष्ट्र

Peacock Dance Video: "नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..", सांगलीत पिसारा फुलवून थुईथुई नाचला मोर; VIDEO पाहाच

Sangali Peacock Dance Video: महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे मयुरराजाला आनंद झाला आहे. सांगलीतील बंचाप्पा बनात मोर पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे. याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशासह महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागली आहे. मुंबई पुण्यासह सर्वत्र पाऊस पडत आहे. पाऊस पडल्याने सर्वत्र निसर्गरम्य वातावरण आहे. पावसामुळे सांगलीतदेखील सर्वत्र हिरवळ पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. शेतकऱ्यांसोबच मयुर राजादेखील आनंदी झाला आहे. सांगलीत मोर पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे. याचाच व्हिडिओ कॅमेराबद्ध झाला आहे.

सांगलीतील पलूसच्या बूर्ली येथील बंचाप्पा बनात मोर पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे. याचाच व्हिडिओ कॅमरात कैद झाला आगे. बंचापा बनात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर मोर पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे. हे दृश्य अगदी नयनरम्य होते.

मोरांचा केकराव आणि मयुरनृत्याचे विलोभनीय दृश्य पक्षीप्रेमींनी आपल्या कॅमेरात टिपली आहेत. हे दृश्य अगदी कमी वेळा पाहायला मिळते. मोराने पावसाचा पुरेपुरे आनंद घेतल्याचे दिसत आहे. मोराचे हे सुंदर दृष्य पाहून आपसूकच नाचरे मोरा, आंब्याच्या बनात या ओळी ओठांवर आल्याशिवाय राहत नाहीत.

मोर आणि पावसाचे वेगळेच नाते आहे. दरवर्षी पहिल्या पावसात मोर बाहेर येऊन सुंदर नृत्य करुन आपला आनंद व्यक्त करतात. मोर पिसारा फुलवून नाचतानाचे दृश्य फार कमी वेळा पाहायला मिळते. हेच दृश्य सांगलीतील लोकांना पाहायला मिळत आहे. मोराचा हा व्हिडिओ सर्वांनाच आवडत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचसोबत पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voting Center: मतदान केंद्रावर कोण कोणत्या सोयी सुविधा, आयोगानं कोणती तयारी केली?

On This Day: रोहित-विराटसह भारतीयांच्या मनात आजही सल, जिव्हारी लागणार्‍या त्या पराभवाची वर्षपूर्ती!

अमेरिकेतून आनंदाची बातमी! SpaceX ने ISRO चा GSAT-N2 उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला, पाहा व्हिडिओ

Utpanna Ekadashi: 'या' तारखेला साजरी होणार उत्पत्ती एकादशी, जाणून घ्या, महत्त्व आणि पुजा विधी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

SCROLL FOR NEXT