Baramati News: मतदानाच्या दिवशीच अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात मारले दोन पक्षी, बारामतीत काय घडलं?

Baramati Lok Sabha 2024: अजित पवार मंगळवारी सकाळी जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले. तेव्हा आशाताई अनंतराव पवार या देखील त्यांच्यासोबत होत्या.
Baramati Lok Sabha 2024 Ajit Pawar Sunetra Pawar
Baramati Lok Sabha 2024 Ajit Pawar Sunetra PawarSaam TV

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे. मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांवरून बारामतीतील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व फूट पडल्याने संपूर्ण पवार कुटुंब शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीमागे उभे राहिलंय. त्यामुळे अजित पवार हे एकाकी पडल्याचं बोललं जात होतं. अगदी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या आई सुद्धा शरद पवार यांना साथ देणार, अशा चर्चा होत्या.

Baramati Lok Sabha 2024 Ajit Pawar Sunetra Pawar
Baramati Lok Sabha: आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, बारामतीत काय घडतंय?

मात्र, मतदानाच्या दिवशीच अजित पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळला. अजित पवार (Ajit Pawar) मंगळवारी सकाळी जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले. तेव्हा आशाताई अनंतराव पवार या देखील त्यांच्यासोबत होत्या. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

कारण, श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यावर आई नाराज असल्याचं म्हटलं होतं. कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती (Baramati) सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या आहेत, असंही श्रीनिवास पवार म्हणाले होते.

आज अजित पवार यांनी मतदानाला येताना आईला सोबत आणत विरोधकांच्या आरोपांमधील सर्व हवाच काढून घेतली. दरम्यान, मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी आपल्यासोबत आई आल्याचा आवर्जून उल्लेख केला.

आशाताई अनंतराव पवार आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आहेत, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले.

मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, बारामतीतील निवडणूक ही भावकीची आणि गावकीची नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षांचा विकास डोळ्यासमोरच ठेवून मतदान करा, असं आवाहन अजित पवारांनी मतदारांना केलं.

Baramati Lok Sabha 2024 Ajit Pawar Sunetra Pawar
Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com