Samruddhi Mahamarg Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गालगत उभी राहणार २२ औद्योगिक शहरे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ruchika Jadhav

Samruddhi Mahamarg:

समृद्धी महामार्ग सुरू होऊन जवळपास दहा महिने झालेत. मात्र या महामार्गावर प्रवाशांना सोयीसुविधा देण्यासंबंधी तसेच औद्योगिक वसाहती, शहरे उभी करण्यासाठीचे प्रकल्प प्रलंबित होते. मात्र आता सरकारने समृद्धी महामार्गावरच्या 22 इंटरचेंजच्या बाजूला औद्योगिक शहरे उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

दोन दिवसांपूर्वी सरकार आणि उद्योजकांची एक बैठक नाशिक येथे पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या अपेक्षा व सूचना जाणून घेतल्यात. त्यामुळे आता लवकरच उद्योजकांसोबत सरकार समृद्धी महामार्गावरच्या 22 एक्स्चेंजवर औद्योगिक शहरे उभी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीये.

या ठिकाणी उभी राहणार औद्योगिक शहरे...

अमरावती , जालना , बुटी बोरी , शहापूर , इगतपुरी , सिंधी , वर्धा , अर्वी , धामणगाव रेल्वे , संभाजीनगर , कारंजा लाड , लासूर , सेलू , मालेगाव जहांगीर , दुसरबीड , सिंदखेडराजा , मेहकर , शेंद्रा , वैजापूर , शिर्डी , सिन्नर , नासिक जोडून या शहरांमध्ये औद्योगिक शहरे उभी राहणार आहेत.

समृद्धी महामार्गालगत जमिनी असलेल्या नागरिकांना याचा फार फायदा होणार आहे. समृद्धी महामार्ग बांधल्यापासून या महामार्गावर आतापर्यंत सर्वाधिक अपघाताची नोंद झाली आहे. महामार्ग बांधल्यापासून टायर फुटणे, वाहनांची एकमेकांना धडक लागणे अशा अनेक घटनांमध्ये भिषण अपघात झालेत.

यात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात आता समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी लवकरच औद्योगिक शहरे उभी राहणार असल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय. शहरे उभी झाल्याने वैद्याकीय सेवा देखील तातडीने पोहचवण्यास मदत होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT