Otur Police News : बहिणीला भेटायला चाललेल्या एकाला तिघांनी दुचाकीवर बळजबरीने बसवुन खुनाच्या हेतूने अपहरण करणाऱ्या तिघा संशयितांच्या ओतूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या सर्व संशयितांना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आल्याचे पाेलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार शिवम छोटेलाल मिश्रा हा त्याचा मित्र समीर पवन सोनवणे याच्या बहिणीस ओतुर बसस्थानक येथे भेटण्यासाठी आला हाेता. त्यावेळी समीर पवन सोनवणे, दिपक यशवंत वाघ व एक अनोळखी मुलगा असे तिघे दुचाकीवरून आले व दिपक वाघ व अनोळखी मुलगा यांनी शिवम मिश्रा याला जबरदस्तीने समीर सोनवणे याच्या जवळच्या मोटारसायकल वर बसून "तुम्ही याला घेवुन पुढे जा मी आलोच" असे म्हणाले.
समीर सोनवणे हा शिवम यास म्हणाला "तेरे को तो पता है हाफ मर्डर से तो फुल मर्डर परवडता है, आज तेरा मर्डर करता हूँ" असे म्हणून मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या अनोळखी मुलास "इसको आज जंगलमे ले जाकर मार डालते है" असे म्हणुन शिवा मिश्रा यास मोटार सायकलवरून जबरदस्तीने ओतुर बस स्थानक येथुन हायवेने कल्याण बाजुकडे घेवून गेले.
मोटर सायकल वरून जात असताना शिवम मिश्रा याने त्यांचेपासून सुटण्याचा जोरदार प्रयत्न केला मात्र पाठीमागे बसलेल्या अनोळखी मुलाने शिवम मिश्रा याचे दोन्ही हात पकडुन धरून खांद्यावर पाठीमागील बाजुस जोरात चावा घेतला. त्यावेळी शिवम यास आज माझा नक्की मर्डर होणार अशी खात्रीवजा भीती वाटल्याने शिवम मिश्रा याने पुर्ण ताकतीने डावीकडे वाकून चालत्या मोटार सायकलवरून उडी मारली.
ही घटना नगर कल्याण मार्गावरील राज लॉन्स येथे घडली असून शिवम मिश्रा हा खाली पडल्याने जखमी झाला आहे. यावेळी दोन्ही दुचाकीस्वार फरार झाले. याबाबत शिवम छोटेलाल मिश्रा, (वय ३०) रा. सतीमंदिर मिथ्यारीपुरा, ता. भारताना, इटावा, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. भोसरी, ता. हवेली, जि. पुणे याने ओतुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
अधिकच्या तपासात संशयितांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेऊन समीर पवन सोनवणे, ओझर नं.१, ता. जुन्नर, जि. पुणे, दिपक यशवंत वाघ, रा. ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे, अर्जुन शंकर कांबळे, रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व संशयितांना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आल्याचे पाेलीसांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.