Wardha Crime News: वर्ध्यातील हॉटेलात हरिणाच्या मांसावर ताव मारणं पडलं महागात; वन विभागाकडून दोघांना अटक

Wardha Crime News: वर्ध्यातल एका हॉटेलात सुरु असलेल्या ओल्या पार्टीत चक्क हरिणाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
Solapur Crime News
Solapur Crime NewsSaamTv
Published On

चेतन व्यास

wardha Crime News:

वर्ध्यातल एका हॉटेलात सुरु असलेल्या ओल्या पार्टीत चक्क हरिणाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सावंगी हद्दीतील टी पॉईंटवर असलेल्या ठाकरे किचन हॉटेलात वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

या प्रकरणात प्रभाकर चोंदे, सावंगी मेघे, सुमीत मुन, कंरजी भोगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चार जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली.

वन विभागाच्या प्राथमिक तपासात हरणाचं मटण आंजी येथून आणलं असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सावंगी परिसरातील टी पॉईंट परिसरात असलेल्या ठाकरे किचन नावाच्या हॉटेलात सहा ते सात जणांनी ओली पार्टी करत होते. त्यावेळी चक्क हरिण शिजवून मासांवर ताव मारल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती.

Solapur Crime News
Pune News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग उद्या वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण?

वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी कर्मचाऱ्यांसह ठाकरे किचन हॉटेलामध्ये जात तपासणी केली. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हरिणाच्या मासांचे तुकडे मिळाले.

खालेल्या मांसाचे नमुने जप्त करुन पार्टीत असलेले प्रभाकर चोंदे आणि सुमीत मुन या दोघांना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची वनविभागाने दिली आहे.

Solapur Crime News
CM Eknath Shinde: वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास होणार? मुख्यमंत्र्यानी प्रशासनाला दिले महत्वाचे निर्देश

तत्पूर्वी, ज्या हॉटेलात हरिणाचे मांस शिजवून खाल्ले त्या हॉटेलात यापूर्वीही अशा ओल्या पार्टी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. हॉटेलात हरिणाचे मांस शिजवून घेतले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com