CM Eknath Shinde: वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास होणार? मुख्यमंत्र्यानी प्रशासनाला दिले महत्वाचे निर्देश

Cm Eknath Shinde: वसाहतीच्या जागेची क्षमता तपासल्यानंतर त्या ठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.
Cm Eknath Shinde
Cm Eknath Shindesaam tv
Published On

Eknath Shinde News:

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासा. तसेच वसाहतीच्या जागेची क्षमता तपासल्यानंतर त्या ठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. (Latest Marathi News)

मुंबईच्या वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याच्या विषयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधून वसाहतीतील सोयी-सुविधांची संपूर्ण माहिती घेतली.

Cm Eknath Shinde
Explainer: ललित पाटील ड्रग्ज प्रकरण नेमकं काय आहे? ज्यावरून तापलंय राज्याचं राजकारण

'वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जागा, तेथील जागेची क्षमता आणि फनेल झोनसह इतर सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर त्या जागेचा सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वांद्रे (पूर्व) येथे सुमारे ९० एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर शासकीय वसाहत उभी आहे. या वसाहतीचे १९५८ ते १९७३ च्या दरम्यान या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या वसाहतीत प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार ७८२ सदनिका आहेत. यापैकी १६९ इमारती धोकादायक आहे. तर ६८ अतिधोकादायक आहेत. तर उर्वरित १०१ इमारती रिकाम्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी दिली.

Cm Eknath Shinde
Scheduled Tribes Commission: महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

'या कर्मचाऱ्यांना लॉटरी पद्धतीने सेवा निवासस्थाने देण्यात येणार आहेत. या वसाहतीमध्ये १२ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तर या वसाहतींमध्ये ४ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १२ इमारतींपैकी एक इमारत सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहाला देण्यात येणार आहे, अशी माहिती म्हैसकर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com