Explainer: ललित पाटील ड्रग्ज प्रकरण नेमकं काय आहे? ज्यावरून तापलंय राज्याचं राजकारण

Lalit Patil Case: पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण नेमकं आहे तरी काय?
lali patil Case
lali patil Case Saam tv
Published On

Lalit Patil Case:

राज्यात सध्या ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याच ललित पाटील प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन देखील समोर आलं आहे. (Latest Marathi News)

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण काय आहे?

2020 मध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणात, ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. ललित पाटीलकडून 16 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील स्वत: अंमली पदार्थ तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

'ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्याचा साथीदाराला देखील अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी 14 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मात्र त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ललित रुग्णालयातून फरार झाला.

lali patil Case
Jayant Patil News: 'ज्या शाळेत तुम्ही आता दाखल झाला, त्याचे मुख्यध्यापक शरद पवारांकडून ट्युशन घेतात', पाटलांची अजित पवारांवर टीका

'ससून'मध्येच सुरू होतं ड्रग्ज रॅकेट?

पुणेतील चाकण भागात अंमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटीलला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ललितची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.

मात्र, येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याने संगनमताने ललितला पोटाचा विकार झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी ललित हा ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला.

ललितला कैद्यांसाठी असलेल्या वॉर्ड नंबर 16 मधे त्याला ठेवण्यात आलं. या 16 नंबर वॉर्डबाहेर पोलिसांचा पहारा असतो. मात्र, ससून रुग्णालयातील कर्मचारी रौफ शेख आणि येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल या दोघांना हाताशी धरुन ललित पाटीलने ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमधून ड्रग्ज रॅकेट चालवायला सुरुवात केली होती , असा आरोप विरोधकांनी केला आहे.

ड्रग्ज प्रकरणाचे दादा भुसेंवर गंभीर आरोप

ललित पाटीलला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे. मंत्री भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, खरी माहिती समोर येईल असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

lali patil Case
Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वर अपघातांचं सत्र थांबेना; महामार्गावरून मुंबईला जाताना सरकारी वकिलाच्या वाहनाला भीषण अपघात

ड्रग्ज प्रकरणाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन

पुण्यातल्या ड्रग्स प्रकरणाच कनेक्शन आता अंडरवर्ल्डशी जोडलं गेल्याच समोर आलंय. पुण्यातल्या ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी ललित पाटील याच्या भावाला अटक झाली. त्यानंतर ललित पाटीलचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन राजन गँगशी असल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान, ललित पाटील फरार असून त्याचा भाऊ भूषण पाटीलला नेपाळच्या सीमेवरुन अटक केली आहे. ललित आणि भूषण हे दोघेही नाशिकच्या शिंदे गावात अंमली पदार्थ बनवायचे. पोलिसांनी भूषण पाटीलला अटक केल्यानंतर अभिषेक बलकवडे या त्याच्या साथीदाराचेही नाव समोर आले. हे दोघे मिळून अंमली पदार्थांची तस्करी करायचे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com