Igatpuri Amane Route Samruddhi Expressway  Indian express
महाराष्ट्र

Samruddhi Highway : आता मुंबईतून नाशिक अवघ्या अडीच तासांच्या अंतरावर; 'समुद्धी'चा शेवटचा टप्पा आज खुला होणार, वाचा सविस्तर

Samruddhi Highway update : मुंबईतून नाशिक अवघ्या अडीच तासां पोहचता येणार आहे. त्यामुळे नाशिकसहित नागपुरात राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Vishal Gangurde

Samruddhi Highway Update: महाराष्ट्रातील गेम चेंजर मानला जाणारा 'समृद्धी महामार्गा'च्या शेवटच्या ७६ किमी टप्प्याचं उद्घाटन उद्या म्हणजे ५ जून रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन केलं जाणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे हा महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यामुळे मुंबईतून नाशिक अडीच तासांत गाठता येणार असल्याचं बोललं जात आहे.

समृद्धी महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्न पाहिलं होतं. त्यांचं हे स्वप्न उद्या म्हणजे ५ जून रोजी सत्यात उतरणार आहे. महाराष्ट्रासाठी गेम चेंजर मानला जाणारा हा समृद्धी महामार्ग प्रकल्प राज्यातील १० जिल्ह्यातून जातो. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासांवर येऊन पोहोचला आहे. समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा आहे. नागपूर आणि मुंबई अशा दोन महानगरांना जोडणारा हा महामार्ग आहे.

समृद्धी महामार्ग' कोणत्या जिल्ह्यांतून जातो?

समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यातून जातो. यात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई अशा एकूण दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या १० जिल्ह्यातील ३९० हून अधिक गावांचा समावेश होतो. तसेच राज्यातील २० हून अधिक तालुक्यांना जोडण्याचं काम हा मार्ग करतो. या महामार्गावर ३३ मोठे पूल आहेत. तर २७४ छोटे पूल आहेत. तसेच यात ६५ उड्डाणपूल आणि ६ बोगद्याचाही समावेश होतो. त्याचबरोबर २६ पथकर नाके आहेत.

आता नाशिक अडीच तासांत गाठा

गेम चेंजर समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर आणि नाशिकच्या प्रवासाचं अंतर आणि वेळ वाचणार आहे. मुंबई ते नाशिक प्रवासाला अवघे ३ तास ४५ मिनिटे लागतात. मात्र, या महामार्गामुळे प्रवास २ तास ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या महामार्गामुळे १ तास २० मिनिटांची बचत होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे जवळपास ४० किमी अंतर कमी झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: उद्यापासून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT