Samruddhi Mahamarg Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने लागली आग, ट्रक जळून खाक

Washim News: अपघातात ट्रकचा टायर फुटून डिव्हाडरला ट्रक घासत गेला.

Ruchika Jadhav

मनोज जयस्वाल, वाशिम

Samruddhi Mahamarg Accident:

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र अद्यापही सुरूच आहे. अपघातामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांचा जीव गेलाय. शनिवारी सकाळी देखील अघाताची मोठी घटना घडलीये. टायर फुटल्याने अपघात होऊन संपूर्ण ट्रकने जागीच पेट घेतला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 163 येथे सकाळी ही घटना घडली आहे. अपघातात ट्रकचा टायर फुटून डिव्हाडरला ट्रक घासत गेला. त्यामुळे ट्रकने पेट घेतला या आगीत ट्रक जळून खाक झालाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक पुण्याहून चंद्रपूरला जात होता. समृद्धी महामार्ग लोकेशन 163 जवळ ट्रकचा समोरचा टायर फुटला. त्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक डिव्हायडरला आदळत त्याचे घर्षण झाले, त्यामुळे ट्रकला आग लागली.

ट्रकचे घर्षण झाल्यामुळे लवकरच डिझेल टँकने पेट घेतला. यामध्ये ट्रक पूर्णपणे जळाला. ट्रकने पेट घेताच वाहन चालकाने ट्रकमधून खाली उडी घेतली आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, समृद्धी महामार्ग लोकेशन 108 पायलट विविधता चव्हाण यांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तेथे पोहचेपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT