Pune Crime News: तुमच्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ आहेत... आयटी अभियंत्याला फुटला घाम, माहिती दिली अन् ३ लाख गायब

Pune Crime News: आयटी अभियंत्याला मोबाईलवर एक लिंक पाठवून माहिती मागवली. त्या लिंकवर माहिती देताच अभियंत्याच्या बँक खात्यातून तीन लाख रुपये ट्रान्सफर झाले.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Digital
Published On

Pune Crime News

पुण्यातील खराडी येथील एका आयटी अभियंत्याला अंधेरीहून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून कॉल आला. समोरील व्यक्ती एका कुरिअर कंपनीतून बोलत होती. ‘‘तुम्ही मुंबई ते तैवान पाठविलेल्या कुरिअर पार्सलमध्ये १४० अमली पदार्थ आढळले आहे. तसेच मनी लॉड्रिंग प्रकरणात तुमचे आधारकार्ड वापरले गेले आहे,’’ असे त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले. शिवाय आयटी अभियंत्याला मोबाईलवर एक लिंक पाठवून माहिती मागवली. त्या लिंकवर माहिती देताच अभियंत्याच्या बँक खात्यातून तीन लाख रुपये ट्रान्स्फर झाले.

या कॉलमुळे आयटी अभियंता क्षणभर गोंधळून गेला. कारण प्रत्यक्षात कुरिअर पाठवलेले नसताना हा कॉल आला होता. अनोळखी व्यक्तीने ही बाब पोलिसांना कळवत असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयटी अभियंत्याने (वय ३२, रा. थिटे वस्ती, खराडी) थेट सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी हे प्रकरण चंदननगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे. त्यानुसार चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Pune Crime News: चक्क 'गर्लफ्रेंड'ला इम्प्रेस करण्यासाठी मोबाईल चोरी, पोलिसांनी लावला डोक्याला हात

पुणे शहरात सध्या अशाप्रकारे कुरिअर पार्सलमध्ये अमलीपदार्थ आढळल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. विशेषत: आयटी अभियंत्यांबाबतच्या घटना अधिक आहेत. तशा तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला माहिती न देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Pune Crime News
Thane Crime News: धक्कादायक! बदला घेण्यासाठी मेहुणीच्या १८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com