>> चेतन व्यास, साम टीव्ही
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्स अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होती की त्यात 26 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातात लहानपणापासून सोबत शिकलेल्या दोन जीवलग मैत्रिणींचा शेवटही सोबतच झालाय. नियतीच्या या खेळाने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालंय.
समृद्धी महामार्गांवर झालेल्या या अपघातात वर्ध्याच्या दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या साईनगर येथील रहिवासी असलेल्या महेश खडसे यांची मुलगी राधिका आणि स्वागत कॉलोनी येथील रहिवासी असलेल्या मदन वंजारी यांची मुलगी श्रेया या दोघी जीवलग मैत्रिणी होत्या.
वर्ध्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघींनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पुण्यातील एक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सोमवारपासून कॉलेज सुरु होणार असल्याने राधिका आणि श्रेया वर्ध्याच्या सावंगी बायपास येथून विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याला जाण्यासाठी बसल्या होत्या. मात्र वाटेतच ट्रॅव्हलचा अपघात झाला आणि दोन्ही जीवलग मैत्रिणींचा यात मृत्यू झाला. (Breaking News)
अपघाताची माहिती मिळताच सकाळी दोन्ही मुलींचे नातेवाईक बुलढाण्याला रवाना झाले. खडसे यांचे संपूर्ण कुटुंब आणि वंजारी यांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले. श्रेया वंजारी हिच्या आई वडिलांना सुरुवातीला घटनेची माहिती देण्यात आली नाही. श्रेयाचे आई वडील घरासमोर जमणारी नागरीकांची गर्दी पाहून चिंतेत होते. पण त्यांना हृदयाचा त्रास असल्याने नातेवाईकांनी त्यांना माहिती दिली नव्हती. परंतु आता त्यांना माहिती देण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)
श्रेया आणि राधिका या दोन्ही मैत्रिणींनी आयुष्यात पुढील वाटचालीचं स्वप्न सोबतच पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या पुण्याला निघाल्या होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला आणि स्वप्न उराशी बाळगून पुण्याला निघालेल्या दोन जीवलग मैत्रिणींचा शेवटही सोबतच झाला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.