Samruddhi Mahamarg Accident Special Report: समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय का? वाचा स्पेशल रिपोर्ट

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून एकही दिवस विना अपघाताचा हा रस्ता राहिलेला नाही.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accidentsaam tv
Published On

>> डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Accident Special Report : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ज्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे, तोच मार्ग आता अपघातांचा रेषा ठरत चाललाय. धक्कादायक म्हणजे राज्यातल्या दहा जिल्ह्यातून जाणारा हा समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यासाठी मृत्यूचा सापळा बनलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय?

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या ट्रॅव्हल्सच्या थरकाप उडवणाऱ्या अपघातात 26 जणांना प्राण गमवावे लागले. समृद्धी महामार्गावरचा हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि भीषण अपघात आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून एकही दिवस विना अपघाताचा हा रस्ता राहिलेला नाही.

11 डिसेंबर ते आजपर्यंत म्हणजे 6 महिने 21 दिवसात 1 हजाराहून आधिक अपघातात 80 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला तर 200 हुन अधिक गंभीर जखमी झाले. पण यातले सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर झाले आहेत.

Samruddhi Mahamarg Accident
Buldhana Bus Accident: बसचा टायर फुटलाच नाही.. बुलढाणा अपघाताबाबत धक्कादायक अहवाल समोर; मग अपघात झाला कसा?

शिर्डी ते नागपूर या 510 किलोमीटरच्या अंतरात दररोज अपघात होत आहेत. हे अपघात का होतात याचा अभ्यास सुरू असला तरी त्यात आता बुलढाणा जिल्ह्यातच का अधिक होत आहेत, याचाही अभ्यास आता तितक्याच गांभीर्याने करण्याची गरज आहे.

11 डिसेंबर 2023 रोजी महामार्ग सुरू झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 200 अपघात झालेत. त्यापाठोपाठ जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले. त्यातुलनेत शिर्डी ते संभाजीनगर, बुलढाणा ते वाशीम आणि पुढे नागपूरपर्यंत अपघातांचं प्रमाण कमी आहे. मात्र संभाजीनगरपासून ते जालना आणि पुढे बुलढाणा ते वाशिमपर्यंत अपघातांचं प्रमाण अधिक आहे.

विशेष म्हणजे मेहकर, सिंदखेड राजा या दरम्यान दर महिन्याला अपघात झाले आहेत. 17 डिसेंबर, 22 जानेवारी, 12 मार्च, 22 मार्च, 21 एप्रिल, 9 मे, 4 जून या काळात झालेले समृद्धीवरील मोठे अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच पॅचमध्ये झालेले आहेत. या तारखा मोठ्या अपघाताच्या आहेत छोटे अपघात तर अनेक झाले आहेत.

त्यामुळे आता या महामार्गावरील या टप्यात होणाऱ्या अपघातांमागीक कारणांचा शोध घेणे गरजेचं आहे. शिवाय समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची जी कारण आत्तापर्यंत समोर आली आहेत, त्यांचं या बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर तीन जिल्ह्यात काही कनेक्शन आहे का? याचाही विचार करणं आवश्यक आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident: आम्ही आरडाओरड करत होतो, पण कुणीही थांबत नव्हतं; प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

राज्याच्या महामार्ग पोलिसांनी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या RTO ने या अपघातांमागील कारणं शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामध्ये आतापर्यंत झालेले सर्वाधिक १०४ अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत. ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडले आहेत. त्यासोबत अतिवेगामुळे ७२, तांत्रिक बिघाडामुळे १६, ब्रेक डाऊन झाल्याने १४, तर इतर काही कारणांमुळे ७४ अपघात घडल्याचे आतापर्यंत समोर आलंय. (Breaking News)

नागपूरच्या व्हीएनआईटी संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने या महामार्गावरील अपघाताच्या कारणांचा अभ्यास केला. त्यात सर्वाधिक अपघात 'महामार्ग संमोहन' यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात चालकाला डुलकी लागणे, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अतिरिक्त भार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन, लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. (Marathi Tajya Batmya)

मुंबई ते नागपूर अशा दहा जिल्ह्यासाठी भाग्यरेषा असणारा समृद्धी महामार्ग मृत्यू रेषा ठरतोय, ती मृत्यू रेषा प्रवाशांच्या आयुष्यात अधिक गडद होऊ नये आणि असा दुःखद दिवस महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा येऊ नये म्हणून या अपघाताच्या पॅचचा विचार करावाच लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com