Buldhana Bus Accident: बसचा टायर फुटलाच नाही.. बुलढाणा अपघाताबाबत धक्कादायक अहवाल समोर; मग अपघात झाला कसा?

Samruddhi Mahamarg Bus Accident: सुरूवातीला बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे चालकाकडून सांगण्यात आले होते.
Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident Saamtv
Published On

Buldhana Bus Accident Reason: समृद्धी महामार्गावरील झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला.

या अपघातात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. सुरूवातीला बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे चालकाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता या अपघाताचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident: बुलढाणा बस अपघाताच्या घटनेने PM नरेंद्र मोदी हळहळले; मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

बसचा टायर फुटलाच नाही....

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात (Buldhana Accident) समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. सुरूवातीला बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली होती.

मात्र याबाबत अमरावती आरटीओचा (Amravati RTO) अहवाल समोर आला असून त्यामध्ये टायर फुटल्याने अपघात झाला नाही, असे प्रथमदर्शी दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचेही या अहवालात म्हणले आहे...

Buldhana Bus Accident
Palghar Accident News: मन सुन्न करणारी घटना! भरधाव पिकअपने बहिण- भावाला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

अपघाताची गृहमंत्रालयाकडून चौकशी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यादृष्टीने गृहविभागाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी (Devendra Fadanvis) या ठिकाणी भेट दिली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com