Ashish Shelar News: राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील भाजपकडून आयोजित मोर्चा आता रद्द करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज ठाकरे (Thackeray Group) गटाकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून (BJP) देखील मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र बुलढाणा बस अपघातानंतर हा मोर्चा आता रद्द करण्यात आला आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे आशिष शेलार यांचे ट्विट...
"बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्णमहाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह (Amit Shah) यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत...
या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे "आक्रोश आंदोलन" आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही.पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू..असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हणले आहे...
भीषण अपघातात २६ जणांचा मृत्यू...
दरम्यान, आज समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.