संजय जाधव, प्रतिनिधी...
Samruddhi Highway News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील होणाऱ्या वाढत्या अपघातांनी चिंता वाढवली आहे. लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले असून यामध्ये शेकडो जणांनी जीव गमावला आहे. एकीकडे अपघातांचे सत्र सुरू असतानाच महामार्गावर मद्यविक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) नागपुर ते मुंबईच्या मध्ये असलेल्या मेहेकर नजिक डोणगाव हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ एका हॉटेलमध्ये चहा कॉफी व नाश्त्या सोबतच दारूही विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे महामार्गावर अपघातांमुळे (Accident) अनेकांचे जीव जात असताना अशाप्रकारे मद्यविक्री होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या अनधिकृत हॉटेल चालकाकडे दारूची मागणी केली असता त्याने एक देशी दारूची बाटली १२० रुपयांना दिली. समृद्धी महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू असते. सोबतच आरटीओसुद्धा असतात तरी असा गंभीर प्रकार होतो कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नागपूर ते मुंबई (Nagpur To Mumbai) या महानगराच्या मध्ये असलेले मेहकर अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे. याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञ सांगत असले तरी त्यातील हे एक महत्त्वाचे कारण आहे. रात्री अपरात्री चालकाला अवैध दारू मिळाल्यानंतर तो दारू पिऊन महामार्गावर गाडी चालवतो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, एक जुलैला बुलढाण्याजवळ (Buldhana Bus Accident) झालेल्या भीषण बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताच्या तपासामध्ये चालकाने दारु पिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.