नागपूर-मुंबई थेट प्रवास केवळ आठ तासांत पूर्ण करण्याची स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण महामार्गाचा अखेरचा इगतपुरी-आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झालंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७०१ किमी लांबीच्या महामार्गावरील अखेरच्या टप्प्यातील ७६ किमीचं बांधकाम पूर्ण झालं असून १० मार्चपर्यंत या मार्गावरील सर्व कामे संपवले जातील. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
एमएसआरडीसीने मुंबई व नागपूरमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले. त्याप्रमाणे ७०१ किमीपैकी नागपूर-इगतपुरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा रस्त्यावर सध्या वाहतूक सेवा सुरू आहे. मात्र या मार्गावरील इगतपुरी – आमणे हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणे अजून बाकी आहे. त्यामुळे हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दरम्यान या महामार्गाचा शेवटचा टप्पा अभियांत्रिकी दृष्टीने सर्वात कठीण होता.
या टप्प्यात तब्बल १२ बोगदे आहेत. यापैकी एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे. उर्वरित ११ बोगदे सरासरी एक किमी लांबीचे आहेत. इगतपुरी – आमणे टप्प्यातील बांधकाम १०० टक्के पूर्ण झालंय. आता अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून ही कामे १० मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
हा महामार्ग ६ लेनचा, १२० मीटर रुंदीचा आणि ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आहे. हा देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे. या महामार्गावर १५० किमी प्रतितास गतीने प्रवास करता येईल. या महामार्गावर ६५ फ्लायओव्हर, २४ इंटरचेंज, ६ बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत. इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब बोगदा बनवण्यात आलाय. हा बोगदा अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे. या महामार्गाच्या उभारणीमुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल तसेच औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.