Coastal Road : मुंबईतील १४००० कोटींच्या कोस्टल रोडला तडे, पीएमओने घेतली दखल

Mumbai Coastal Road : तब्बल १४००० कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोस्टला रोडला तडे गेल्याचे समजतेय. याची दखल पीएमओकडून घेण्यात आली आहे.
Mumbai Coastal road
Mumbai Coastal roadSaam Tv News
Published On

Mumbai Coastal Road News Update : तब्बल १४००० कोटी रूपये खर्च करून मुंबईमध्ये तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्याचे समोर आले आहे. हाजी अली ते वरळी यादरम्यानच्या रोडवर तडे गेले आहेत. बीएमसीकडून याचे पॅचवर्क करण्यात आलेय. कोस्टल रोडवर पॅचवर्क करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोस्टल रोडवरील तडे गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याची दखल पीएमओकडून घेण्यात आली असून मुख्य सचिवांना याबाबतची माहिती विचारण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत बीएमसीला नोटीस पाठवण्यात आल्याचेही समजतेय. (Cracks Appear on Mumbai Coastal Road, PMO Seeks Report from State Government)

दरम्यान, कोस्टल रोडच्या क्वालिटीवर याआधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मार्च २०२४ मध्ये कोस्टल रोडचा एक टप्पा सुरू करण्यात आला होता. पण अडीच महिन्यातच टनलमध्ये समुद्राचे पाणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हे लिकेज रोखण्यासाठी विशेष अशा इपोक्सी केमिकलचा वापर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कोस्टल रोडला तडे गेल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

Mumbai Coastal road
Sourav Ganguly Car Accident : सौरव गांगुलीच्या कारचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला दादा

कोस्टल रोडला तडे गेले आहेत, त्यासंदर्भात राज्य सरकारकडून बीएमसीला जाब विचारला आहे. हाजी अली पुलाच्या उत्तरेस रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण झाले होते, पण आता काही ठिकाणी क्रॅक दिसले आहेत, असे बीएमसीकडून सांगण्यात आले.

Mumbai Coastal road
Maharashtra Politics : ठाकरेंना विदर्भातही मोठा धक्का, महत्त्वाचा शिलेदार शिंदेंच्या गोटात जाणार

पावसाळ्यात रोडवर होणारे क्रॅक रोखण्यासाठी डांबर वापरुन तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. पण अतिरिक्त डांबरामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना त्रास झाला. या पॅचेस आवश्यकतेनुसार भरण्यात येईल. कायमस्वरुपी आणि टिकाऊ यावर उपाय शोधला जाईल, असे बीएमसीकडून सांगण्यात आले.

Mumbai Coastal road
Maharashtra Politics : ठाकरेंना विदर्भातही मोठा धक्का, महत्त्वाचा शिलेदार शिंदेंच्या गोटात जाणार

२६ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोस्टल रोड पूर्णपुणे खुला करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंतच्या ११ किमी लांबीच्या कोस्टल रोड हा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. बीएमसी आणि राज्य सरकारने संयुक्तपणे या कोस्टल रोडचे निर्माण केले आहे. पण कोस्टल रोडला क्रॅक गेल्यामुळे १४००० कोटींचा हा रस्ता पुन्ह एकदा चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com