Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भातही मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील महत्त्वाचा शिलेदार आणि शेकडो कार्यकर्ते आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजतेय. (Eknath Shinde’s ‘Operation Tiger’ Gains Momentum in Vidarbha as Key Thackeray Ally Switches Sides)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या निकालानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकीकडे आभार सभा होत असतानाच दुसरीकडे ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. आज ते नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ऑपरेशन टायगर राबवत अनेकजण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात आज सायंकाळी कन्हान येथे होणाऱ्या आभार सभेत काटोल विधानसभा मतदारसंघातील राजू हरणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राजू हरणे हे विदर्भातील ठाकरेंचे विश्वासू समजले जातात, आज ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राजू हरणे यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे समजतेय. राजू हरणे हे ठाकरेंच्या शिवसेनेच माजी जिल्हा प्रमुख होते. विधानसभा निवडणुकीनंतर ते विदर्भात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आज ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, मराठवाडा, नाशिक आणि आता विदर्भातील नेतेही ठाकरेंची साथ सोडत आहे. कोकणात राजन साळवी यांच्या रूपाने ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच आता विदर्भातही त्यांना मोठा धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.