Samruddhi Mahamarg Accident संजय जाधव
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : भयावह! ट्रकखाली कार चिरडली अन्...; समृद्धी महामार्गावरील काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

Car Accident : दोन्ही वाहनांचा वेग इतका जास्त होता की यामध्ये आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली.

संजय जाधव, साम टीव्ही

Nagpur Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. विकासाचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर सिंदखेडराजा नजिक भरधाव इनोव्हा कार ट्रकवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. (Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ईनोव्हा कार शिर्डीहून नागपूरकडे जात होती. यावेळी कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. यावेळी समोरून मोठा ट्रक भरधाव वेगात आल्याने कार आणि ट्रकची जोरात धकड झाली. दोन्ही वाहनांचा वेग इतका जास्त होता की यामध्ये आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली.

या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर काही काळ नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

एकाच दिवसात दोन अपघात

समृद्धी महामार्गावर आज एकाच दिवसात दोन मोठे अपघात झाले आहेत. महामार्गावर सकाळी टायर फुटून भीषण अपघात (Accident) झाला आहे. नाशिकहून (Nashik) यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा समोरील टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने ही गाडी समृध्दी महामार्गाच्या रस्त्याच्या मधोमध जाऊन थांबली. टायर फुटला तेव्हा गाडीमध्ये चार जण प्रवास करीत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात चौघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा मृत्यू

दरम्यान, याच समृध्दी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात गेल्या ३ दिवसांमधील हा तिसरा अपघात आहे. (१८ एप्रिल) रोजी नागपूरचे माजी रणजीपटू आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे माजी क्युरेटर प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी या जागीच ठार झाल्या. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा चुराडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

SCROLL FOR NEXT