Samruddhi Accident News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; थरारक घटनेत २ ठार ३ जखमी

Samruddhi Expressway Accidnt: समृद्धी महामार्गावर कारचा मागील टायर फुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

मनोज जैस्वाल

Buldhana:

समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण थांबता थांबत नाहीये. सातत्याने येथे अपघाताच्या घटना घडत आहेत. आज देखील समृद्धी महामार्गावरून जाताना एका कारचा मागचा टायर फुटला. यामुळे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चारचाकीतून व्यक्ती अमरावतीवरून संभाजीनगरकडे जात होते. यावेळी समृद्धी महामार्गावर कारचा मागील टायर फुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जण ठार तर 3 जण जखमी झालेत.

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कार्ली लोकेशन १६८ वर हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की कार थेट डिव्हायडरला धडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतास बाहेर काढून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रक्रूती चिंताजन असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगासह टायर फुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीये. समृद्धीचा मार्ग म्हणून हा महामार्ग बांधण्यात आला होता. मात्र येथील अपघाताच्या घटना वाढत असल्याने येथून प्रवास करण्यासाठी नागरिकांच्या मनात भीती भरलीये.

समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे असे एकून ७२९ अपघात झालेत. यातील ४७ अपघातात व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. या ४७ अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ९९ अपघातात २६२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT