Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Priya More
  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

  • भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली

  • या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  • पुण्याहून जालन्याकडे जाताना ही घटना घडली

माधव सावरगावे, संभाजीनगर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडील आणि त्यांच्या ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला. एकाच कुटुंपातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नागपूर कॉरिडोरवरील वेरूळ परिसरात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ​लहान भावाच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने आई-वडिलांना न सांगता अचानक भेटून 'सरप्राईज' देण्यासाठी पुण्यावरून गावी जालन्याकडे निघालेल्या एका सुखी कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला. नागपूर कॉरिडोरवरील वेरूळ परिसरात चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुण, त्याची पत्नी आणि अवघ्या ७ वर्षांच्या गोंडस चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. प्रतीक रामकिसन जगदाळे (वय ३५ वर्षे), त्यांची पत्नी श्रेया राजेंद्र पांडे (वय ३२ वर्षे) आणि मुलगा रुद्रांश प्रतीक जगदाळे (वय ७ वर्षे) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पुण्यातील मुळशी परिसरात राहत होत.

प्रतिक कुटुंबासह कारने जालनाच्या दिशेने पहाटे सहा वाजताच्या सुमारास निघाले होते. प्रतीक यांची कार समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर ४४९ (नागपूर कॉरिडोर) पर्यंत पोहोचली. पुण्यावरून जालन्याकडे कारने जात असताना

त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार समोरील ट्रकला जाऊन जोरात धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भाग ट्रकच्या खाली घुसून चक्काचूर झाला. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मदत पथकाने 'क्यूआरव्ही'च्या मदतीने कारचा पत्र कापून तिघांना बाहेर काढले. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Paneer Water Soup Recipe : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT