Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : मराठवाड्यातील ६०० पेक्षा अधिक गावे अजून तहानलेलीच; टँकरची संख्या पोचली ७०० च्या वर

Sambhajinagar News : पाऊस कमी झाल्याने प्रामुख्याने मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील जवळपास ६०० हुन अधिक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर  : गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाई (Water Scarcity) समस्या ही अधिकच गंभीर बनत चालली आहे. मार्च महिना संपला असल्याने (Sambhajinagar) आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई नागरिकांना भासू लागली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील टँकरची संख्या आता सातशेच्या वर पोहोचली आहे. (Tajya Batmya)

पाऊस (Rain) कमी झाल्याने प्रामुख्याने मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील जवळपास ६०० हुन अधिक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या गावांमधील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (Marathwada) प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करून ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे आताच्या स्थितीला ट्रॅकरची संख्या ७०० च्या वर पोहचली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जायकवाडीत केवळ २२ टक्केच साठा 

पाऊस नसल्याने नद्या, नाले कोरडे आहेत. तसेच तलावात असलेला पाणी साठा देखील खालावत चालला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तलाव आणि विहिरी कोरड्या टाक असल्याचे चित्र आहे. परिणामी या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसत असून जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात देखील केवळ २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT