Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्यांनो सावधान, गर्दीत चोरटे करतायेत हात साफ; पाहा धक्कादायक CCTV व्हिडीओ

Sambhajinagar Crime: गर्दीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांना लुटणाऱ्या चोरट्यांपासून आता सावध राहा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

नोकरीनिमित्त शहरामध्ये राहणारे नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासोबत आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे रेल्वे, बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा चोरटे उचलत आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून ते प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल चोरी करत आहेत. संभाजीनगरमध्ये चोरीची घटना घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या सर्वसामान्यांचा खिसा कापणे आणि मोबाईल चोरणारे चोरटे बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी सक्रिय झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात गर्दी आणि घाईगडबडीची संधी साधून खिसा कापू आणि मोबाईल चोरीच्या घटनांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांना लुटणाऱ्या चोरट्यांपासून आता सावध राहण्याची गरज आहे. या चोरांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकात रात्री साडेअकरा वाजता चोरीची घटना घडली. कार्तिकराज मलिक हा तरुण पुणे येथे कॉलेजला जात असताना चोरट्याने गर्दीत घुसून प्रवाशी असल्याचे भासवत त्याचा मोबाईल चोरला. त्यानंतर कार्तिकराजचे वडील अरुण मलिक यांनी बस स्थानकातील सर्व कॅमेरे तपासले असता त्यामध्ये आरोपी कैद झाला. आरोपीचे हे व्हिडिओ त्यांनी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये दिले.

क्रांती चौक पोलिसांनी बस स्थानक परिसरामध्ये फिरत असलेल्या त्या मोबाईल चोरट्याला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोबाईल चोराने गुन्हा कबुल केला पण तो कोणाला विकला आहे सांगितले नाही. आता त्याचा पोलिस तपास घेत आहेत. देशात आणि राज्यात कुठेही तुम्ही असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवास करत असाल तर तुम्ही तुमचे खिसे, पॉकेट आणि मोबाईल सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. कारण दिवाळीमध्ये घरी जाताना आपल्या खिशातील पैशांवर या खिसे कापू आणि चोरट्यांचा डोळा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2024: दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? घरात येईल सुख-समृद्धी

Maharashtra News Live Updates : चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी; भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Ranji Trophy: BCCI चा ढिसाळ कारभार! खेळपट्टी सुकवण्यासाठी करावा लागतोय देसी जुगाड - Photo

Nashik News : नाशिक मध्यच्या जागेवरून अजूनही संभ्रम; उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता

Imtiaz Jaleel : विजय आमचाच, राजकारणात थोडा सस्पेन्स ठेवावा लागतो; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT