Maharashtra Election: संजय शिरसाट यांना ठाकरेंच्या राजू शिंदेंचं आव्हान; संभाजीनगर पश्चिमचा गड राखणार?

Sanjay Shirsat vs Raju Shinde: संजय शिरसाट यांच्या समोर राजू शिंदे यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे शिरसाट छत्रपती संभाजीनगर पश्चिमचा गड राखतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Maharashtra Election: संजय शिरसाट यांना ठाकरेंच्या राजू शिंदेंचं आव्हान; संभाजीनगर पश्चिमचा गड राखणार?
Sanjay Shirsat vs Raju Shinde
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. मात्र या मतदारसंघाचं राजकीय गणित नेमकं कसं आहे? याबरोबरच शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदेंसमोरची आव्हानं काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभेचं बिगूल वाजलंय. तर संभाजीनगर पश्चिममधून शिंदे गटाने विद्यमान आमदार संजय शिरसाट यांना तर ठाकरे गटाने राजू शिंदेंना मैदानात उतरवलंय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पश्चिमची लढत चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. तर संजय शिरसाटांनी 15 वर्षात विकासच केला नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या राजू शिंदेंनी शिरसाटांवर केलाय. तर मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे आपणच विजयी होऊ, असा विश्वास संजय शिरसाटांनी व्यक्त केलाय.

संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून संजय शिरसाट सलग तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर मतदारसंघाचं समीकरण बदललंय. तर 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या राजू शिंदेंना आयात करत ठाकरेंनी संजय शिरसाटांची कोंडी केलीय.. मात्र 2019 मधील मतांचं गणित नेमकं कसं होतं? पाहूयात.

2019 मधील राजकीय समीकरण?

संजय शिरसाट, आमदार, शिवसेना- 83 हजार 792 मतं

राजू शिंदे, अपक्ष, 43 हजार 347 मतं

अरुण बोर्डे, एमआयएम, 39 हजार 336 मतं

40 हजार मतांच्या लीडने शिरसाट विजयी

संभाजीनगर पश्चिमची निवडणूक शिरसाट आणि शिंदेंसाठी सोपी नाही. कारण निवडणूक लढवण्यासाठी बंडखोरांची फौजच रिंगणात उतरलीय.

संभाजीनगर कुणाची बंडखोरी?

बाळासाहेब गायकवाड, हे ठाकरे गटातून बंडखोरीच्या तयारीत आहेत.

जितेंद्र देहाडे हे काँग्रेसकडून बंडखोरीच्या करण्याची शक्यता.

रमेश गायकवाड यांनी ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत मराठवाडा बहुजन विकास आघाडीकडून रिंगणात आहेत.

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या संजय शिरसाटांना अखेरपर्यंत मंत्रिपदाने हुलकावणी दिलीय. तर अंबादास दानवेंनी संभाजीनगर पश्चिम प्रतिष्ठेची केलीय..त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतरही आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिरसाटांना किल्ला लढवावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com