Ghati Hospital Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Dengue Update: संभाजीनगरमध्ये डेंग्यूने टेन्शन वाढवलं, रुग्णांचा आकडा २७ हजारांवर; नागरिकांमध्ये भीती कायम

Dengue Patients Increased In Sambhajinagar : महिनाभरात संभाजीनगरमध्ये २७ हजारांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले आहेत. दिवसाला ६ हजार डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More

रामू ढाकणे, संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये डेंग्यूने टेन्शन वाढवले आहे. संभाजीनगरमधील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिनाभरात संभाजीनगरमध्ये २७ हजारांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले आहेत. दिवसाला ६ हजार डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत आहेत. पण महापालिकेकडे फक्त २० अहवाल येत आहेत. प्रशासनाला डेंग्यूबाबत गांभीर्य नसल्याचा आरोग नागरिकांकडून केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिका आरोग्य केंद्र, मिनी घाटी, घाटी आणि खासगी रुग्णालयांच्या बाह्य रुग्णांमध्ये रोज सुमारे १४ हजार रुग्ण येतात. त्यापैकी ६ हजार रुग्ण हे तापाचे असल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी दिली. धक्कादायक बाप म्हणजे त्यातील ९०० जणांना डेंग्यूची लक्षणे आहे. मात्र यातील फक्त १५ ते २० नमुन्यांचे अहवाल हे मनपाच्या आरोग्य विभागाकडे येतात.

मागच्या आठवड्यात डेंग्यूसदृश्य आजारामुळे दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला त्यानंतरही खासगी आणि प्रशासकीय पातळीवर याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते आहे. अनेक डॉक्टर आणि खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्या करून उपचार देतात. त्यामुळे खऱ्या डेंग्यूच्या रुग्णांचा आकडाच समोर येत नसल्याने सध्या सुरू असलेली मनपाची मोहीम फक्त अंदाजपंची आखल्याची चर्चा सुरू आहे.

संभाजीनगरमध्ये सतत पडणारा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे साथीचे आजार पसरत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये डेंग्यूसदृश्य लक्षणे आढळून येत आहेत. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाचा वॉर्ड सध्या बालरुग्णांनी भरलेला आहे. या विभामध्ये ९६ खाट आहेत आणि ९७ मुलं उपचार घेत आहेत. संभाजीनगरमध्ये डेंग्यूमुळे २ मुलांचा मृत्यू झाला. अशामध्ये आता डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT