Dengue: डेंग्यूपासून मुक्ती मिळणार? डासांची फौज करणार डेंग्यूचा खात्मा? सिंगापूरच्या संशोधकांचा शोध

Dengue Mosquitoes : पावसाळा सुरु झाला की डेंग्यू देशाचं टेंशन वाढवतो. मात्र आता या डेंग्यूचा खात्मा करण्यासाठी सिंगापूरने डासांची फौज तयार केलीय. ही फौज डेंग्यूचा खात्मा करणार आहे. या डासामुळे डेंग्यूचा नेमका कसा खात्मा होणार? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
Dengue: डेंग्यूपासून मुक्ती मिळणार? डासांची फौज करणार डेंग्यूचा खात्मा? सिंगापूरच्या संशोधकांचा शोध
Dengue Mosquitoes
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

पावसाळा सुरु झाला की साथीचे रोग डोकं वर काढतात. सध्या डेंग्यूने देशाचं टेंशन वाढवलंय. डेंग्यूमुळे नागरिक भीतीच्या छायेत जगताहेत. मात्र याच जीवघेण्या डेंग्यूचा खात्मा करण्यासाठी सिंगापूरने चक्क डासांची फौज तयार केल्याचं संशोधन पुढे आलंय.

डासांची फौज करणार डेंग्यूचा खात्मा?

सिंगापूरच्या राष्ट्रीय पर्यावरण एजन्सीकडून डेंग्यूचा खात्मा करण्यासाठी वॉल्बाचिया नर जातीच्या डासाची प्रयोगशाळेत निर्मीती

एडिस जातीचा नर आणि मादी एकत्र आल्यानंतर वॉब्लाचिया बॅक्टेरियाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम

वॉब्लाचिया बॅक्टेरियामुळे डेंग्यूची नवी प्रजाती रोखली जाणार.

वॉब्लाचिया एडिस डासाचा मानवाला धोका नाही.

दरवर्षी देशात लाखो लोकांना डेंग्यूची लागण होते. तर शेकडोंचा बळी जातो. दवाखाने रुग्णांनी भरतात. उपचारासाठी नागरिकांची हेळसांड होते. हे चित्र दरवर्षी असतं. डेंग्यूची भारतातील आकडेवारी काय आहे पाहूयात?

डेंग्यूने वाढवलं भारताचं टेंशन

2021 मध्ये देशात 1 लाख 93 हजार 245 रुग्ण (मृत्यू- 346)

2022 मध्ये देशात 2 लाख 33 हजार 251 रुग्ण (मृत्यू-303)

2023 मध्ये 2 लाख 89 हजार 235 रुग्ण (मृत्यू-485)

एप्रिल 2024 पर्यंत 19 हजार 447 रुग्ण (मृत्यू - 16)

डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरु आहे. मात्र सिंगापूरमध्ये झालेल्या संशोधनामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याची आशा निर्माण झालीय. त्यामुळे सरकार डासांची फौज भारतात आणून डेंग्यूसह साथीच्या रोगावर नियंत्रण कधी मिळवणार? याचीच प्रतीक्षा आहे.

Dengue: डेंग्यूपासून मुक्ती मिळणार? डासांची फौज करणार डेंग्यूचा खात्मा? सिंगापूरच्या संशोधकांचा शोध
Mosquito Refill Liquid : डेंग्यू-मलेरिया होण्याआधीच सावधान! मच्छरांना पळवण्यासाठी घरीच बनवा रामबाण औषध

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com