Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : एनओसीसाठी दीड लाखाची लाच; मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह लिपिक निलंबित

Sambhajinagar News : संभाजीनगर शहरातील एका व्यवसायिकाने एनओसीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी मुख्य अधिकारी आणि लिपिक यांनी दीड लाखाची मागणी केली होती.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : अग्निशामक विभागातील मुख्य अधिकाऱ्याने ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. यात चौकशी केली असता दोषी आढळून आल्याने मुख्य अग्निशनम अधिकाऱ्यांसह विभागातील लिपिकावर महापालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिकेच्या अग्निशमन विभागात साधारण महिनाभरापूर्वी अर्थात पस्तीस दिवसापूर्वीच प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून नेमलेल्या संपत भगत आणि लिपिक एम. बी. नरके यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाख रुपये घेतले होते. (Bribe) रक्कम घेतल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली. यामुळे महापालिका प्रशासनानात खळबळ उडाली आहे. 

संभाजीनगर शहरातील एका व्यवसायिकाने एनओसीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी मुख्य अधिकारी आणि लिपिक यांनी दीड लाखाची मागणी केली होती. (Fire Brigade) ठरल्यानुसार व्यावसायिकाकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारली होती. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर दोघांनी लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी तडका फडकी निलंबनाची कार्यवाही केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT