Bhakti Mahamarg
Bhakti MahamargSaam tv

Bhakti Mahamarg : भक्ती मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक; टॉवरवर चढून आंदोलन

Buldhana News : महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे
Published on

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. सदरचा महामार्ग विरोधात आता शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवल आहे. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले असून आज शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेलो जोरदार घोषणाबाजी देखील केली.  

Bhakti Mahamarg
Amravati Corona Virus : अमरावती शहरात पुन्हा चार कोरोना बाधित, तीन स्वाइन फ्लूचे रुग्ण

सिंदखेडराजा ते शेगाव (Shegaon) हा भक्ती महामार्ग करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही; असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं होते. मात्र हा महामार्ग तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्यामुळे महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. 

Bhakti Mahamarg
Bhandara News : जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, ४५ जनावरांची सुटका; कारधा पोलिसांची कारवाई

सदरचा भक्ती महामार्ग रद्द झाला पाहिजे. या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात (Farmer) शेतकऱ्यांनी टावर वर चढून आंदोलन सुरू केले आहे .जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.. महामार्गासाठी जमिनी देणार नाही; अशी जोरदार घोषणाबाजी शेतकरी टावर वर चढून करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com