Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या घरावर लागणार पाट्या; राज्य सरकारच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गरिबांना धान्य मिळावे यासाठी शासनाने अंत्यय योजना सुरू केली आहे मात्र त्यांचे धान्य इतरत्र पळवले जाते. यावर पर्याय काढत लाभार्थ्यांना धान्य मिळावे यासाठी अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या घरांवर पाट्या लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात लवकरच घरांवर पाट्या लावण्यात येणार आहेत. 

बीपीएल अर्थातच अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या घरावर पाट्या लावण्याच्या सूचना आता राज्य शासनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गरिबांना धान्य मिळावे यासाठी शासनाने अंत्योदय योजना सुरू केली आहे. मात्र त्यांचे धान्य इतरत्र पळवले जात असल्याची बाब आणि तक्रारी वाढल्यामुळे शासनाकडून कार्ड (Ration Card) धारकाची ओळख व्हावी; यासाठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून पाट्या लावण्याचे काम लवकरच केले जाणार आहे. 

जिल्ह्यात ६६ हजार लाभार्थी 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यात ६६ हजार १०५ लाभार्थी हे अंत्योदय योजनेचे आहेत. या सर्व लाभार्थ्यांच्या घरांवर पाट्या लावल्या जाणार असल्याने त्यांचे धान्य द्यावे लावणार आहे. यामुळे गरिबांचे धान्य लुटणाऱ्यांची आता गोची होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

Marathi News Live Updates : आमदार बच्चू कडूंना मोठा धक्का; प्रहारचा आमदार शिंदे गटाने पळवला

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

SCROLL FOR NEXT