Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : संभाजीनगरातील सर्वच होर्डिंग अनाधिकृत; महापालिकेकडून सात दिवसाची मुदत

Sambhajinagar News : मुंबईतील घाटकोपर भागात महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सदरच्या घटनेनंतर राज्यातील सर्वच शहरातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले ४१० होल्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्राची मुदत ही दोन महिन्यापूर्वीच संपली असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हे सर्वच होर्डींग अनधिकृत ठरले असून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) भागात महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सदरच्या घटनेनंतर राज्यातील सर्वच शहरातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिका प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. शहरात लावलेल्या सर्व होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. दरम्यान यानंतर आता प्रत्येक वर्षी स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करावे लागेल असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

७ दिवसांची दिली मुदत 

संभाजीनगर महापालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शहरातील सर्व होर्डिंगची मुदत संपली असून ते अनधिकृत ठरविले आहेत. त्यामुळे पुढील ७ दिवसात होर्डिंगसह संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट तयार करून अहवाल सादर करावा; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

SCROLL FOR NEXT