Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी स्रोत्र दूषित; आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत गंभीर बाब उघड

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेने केलेल्या पाणी तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: दुष्काळी परिस्थिती असून राज्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यात आता धाराशिवमध्ये दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी पुरवठा करणारे स्त्रोत्र दूषित असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे धाराशिववासीयांना पाण्याचे स्रोत असूनही ते पिण्यास वापरता येणार नाही. 

Dharashiv News
Dhule Crime : धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेने केलेल्या पाणी तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे. पाणी स्त्रोत्र दूषित असून पिण्यास योग्य नसल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेने जिल्ह्यातील ११०२ स्त्रोताची तपासणी केली असता त्याच्यात हे वास्तव समोर आले आहे. या पाण्याचे निर्जंतीकरण करूनच पाणी प्यावे; असे आरोग्य विभागाच्यावतीने नोटीस काढून सांगण्यात आले आहे. 

Dharashiv News
Mira Bhayandar Crime : वयोवृद्धाला ब्लॅकमेल करून मागितली खंडणी; चार महिलांसह एकजण ताब्यात

एक टक्काच पाणीसाठा 

राज्यात असलेल्या पाणी टंचाईचे (Water Scarcity) सावट धाराशिव जिल्ह्यात देखील जाणवत आहे. धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असून एक टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातच आता हे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी ही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com