Mira Bhayandar Crime : वयोवृद्धाला ब्लॅकमेल करून मागितली खंडणी; चार महिलांसह एकजण ताब्यात

Mira Bhayandar News : फोनवर असलेल्या समोरच्या महिलेने त्यांच्या मैत्रिणीने फोन नंबर दिला असून नोकरीच्या कामाबाबत भेटायचे असल्याचे सांगितले
Mira Bhayandar Crime
Mira Bhayandar CrimeSaam tv

महेंद्र वानखेडे

मिरा भाईंदर : एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत मैत्री करून नंतर त्याला फसवून, खोटे आरोप लावत मारहाण आणि ब्लॅकमेल करत पैसे मागण्याचा प्रकार काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यात चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. 

Mira Bhayandar Crime
Dhule Crime : धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात

काशिगाव पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर असलेल्या समोरच्या महिलेने त्यांच्या मैत्रिणीने फोन नंबर दिला असून नोकरीच्या कामाबाबत भेटायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर ते काशिमीरा परिसरात भेटले व त्यांच्यात बोलणे झाले. मात्र ऊन जास्त असल्याने हॉटेलमध्ये बसून बोलू; असे सदर महिलेने सांगितल्याने सर्व जण हॉटेलमध्ये गेले. 

Mira Bhayandar Crime
Beed News : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे पडलं महागात; बीड पोलिसांची दीड महिन्यात १९१ जणांवर कारवाई

मात्र हॉटेलमध्ये गेल्यावर (Crime News) महिलेने वृद्धासोबत गैरकृत्य करण्यास सुरवात केली. त्यानंतर पैसे मागण्यास सुरवात केली. तसेच तिच्या साथीदाराना बोलवून वृद्धास रिक्षात बसवून बोरिवली व उत्तन परिसरात घेऊन जाऊन पैसे देण्यासाठी मारहाण करण्यात आली होती. १ लाख रुपये न दिल्यास त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील देण्यात दिली. सदर घडल्या प्रकाराबाबत वृद्धाने पोलिसात जात तक्रार दिली. तक्रारदाराच्या सांगण्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच आरोपीना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com