Gram Price : हरभऱ्याच्या दरात प्रथमच वाढ; अमरावती बाजार समितीत ६ हजार प्रति क्विंटल दर

Amravati News : रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी थेट मार्केटमध्ये हरभरा विक्रीसाठी नेला होता.
Gram Price
Gram PriceSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: रब्बी हंगामातील हरभरा काढणीनंतर मार्केटमध्ये चांगला दर अद्याप मिळत नव्हता. परंतु मागील आठ दिवसांत हरभऱ्याच्या दरात वाढ होत असून अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या ६ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे. 

Gram Price
Bhadgaon Accident : पुलाचा कठडा तोडून दुचाकी कोसळली खाली; दोघा मित्रांचा मृत्यू

रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी थेट मार्केटमध्ये हरभरा विक्रीसाठी नेला होता. परंतु त्यावेळी मिळेल त्या दारात हरभरा विक्री करावी लागली होती. दरम्यान (Bajar Samiti) बाजार समितीमध्ये हरभऱ्याला साडेपाच हजार रुपयांवर दर स्थिरावले होते. यंदाच्या हंगामापासून पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत हरभऱ्याचा भाव स्थिरावलेला आहे. मात्र मे महिन्यात दरात तेजी आल्याने हरभऱ्याने सहा हजारांचा टप्पा (Amravati) पार केला आहे. 

Gram Price
Bajari Price News: बाजरीच्या दरात ६०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

शेतकरीचा फायदा 

अडचणीतील शेतकऱ्यांनी (Farmer) मिळेल त्या भावात हरभऱ्याची विक्री केली. मात्र, काही शेतकऱ्यांनी साठवणूक केल्याने त्यांना दरवाढीचा फायदा होत आहे. सध्या हमीभाव ५ हजार ३३५ रुपये असताना त्यापेक्षा दीड हजार रुपये जास्त मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे. यामुळे शतकर्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com