Marathwada Temperature Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Temperature : मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला; तापमान पोहचले ४२ अंशाच्यावर

Sambhajinagar News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये १८ एप्रिलचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होते. आज पुन्हा सकाळपासून उन्हाचा चटका वाढला आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आल्याची पाहण्यास मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच शहरातील (Temperature) तापमान हे ४० अंशाच्या वर पोहचले आहे. दरम्यान मराठवाड्यात देखील पारा ४२ अंशाच्या वर पोहचला असून उन्हाची वाढलेली दाहकता आता असह्य होवू लागली आहे. (Latest Marathi News)

मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये १८ एप्रिलचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होते. आज पुन्हा सकाळपासून उन्हाचा चटका (High Temperature) वाढला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे. दुपारच्या सुमारास सूर्य अक्षरशः आग ओकत असून यावेळी जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात ४१.६, जालना ४१, नांदेड ४१, लातूर ४१, धाराशिवमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आणखी तापमान वाढीचा इशारा 

राज्यात उच्चाकी तापमानाची नोंद होत आहे. मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यात तापमान वाढत आहे. संभाजीनगर शहरात देखील यंदाचे सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान २४ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी आवश्यक कामानिमित्तानेच बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT