चर्चा तर हाेणारच! शरद पवार गटाचा नेता अजित पवार गटाच्या आमदारांच्या भेटीला (पाहा व्हिडिओ)

Madha Lok Sabha : विजयसिंह माेहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माढ्यात महायुतीच्या विरोधात लढतायत निवडणूक.
vijaysinh mohite patil meets rajan mohite patil
vijaysinh mohite patil meets rajan mohite patil Saam Digital

Madha Lok Sabha Election 2024 :

महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत अग्रभागी असलेले माेहाेळचे आमदार राजन पाटील यांनी नुकतीच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला. ते महायुतीच्या प्रचारात देखील आहेत. मोहिते-पाटील गटाने महायुतीशी फारकत घेत नाईक निंबाळकरांना विराेध दर्शवित धैर्यशिल माेहिते-पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

vijaysinh mohite patil meets rajan mohite patil
Amravati Water Supply : अमरावती आणि बडनेरा शहराला होणारा पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

राजन पाटील यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेतली. अचानकपणे एकेकाळचे सहकारी आणि सध्या विरोधी गटात असणाऱ्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. लोकसभेची निवडणुकीत मुख्य उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर ही भेट झाल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

vijaysinh mohite patil meets rajan mohite patil
Satara Constituency: उदयनराजेंना शरद पवार प्रखर विराेध करताहेत? दमयंतीराजेंनी स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडीओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com