Jalgaon Temperature
Jalgaon TemperatureSaam tv

Jalgaon Temperature : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांवर

Jalgaon News : एप्रिलमध्ये काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्याचे तापमान १७ एप्रिलला तापमान ४४.५ अंशांवर पोचले होते

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील तीन- चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Jalgaon) सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. मागील दोन दिवसात पारा वर चढला असून जळगावातील (Temperature) आजचे तापमान हे ४५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे.  (Maharashtra News)

Jalgaon Temperature
Parola News : अवकाळीने केले नुकसान; कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन 

एप्रिलमध्ये काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्याचे तापमान १७ एप्रिलला तापमान ४४.५ अंशांवर पोचले होते. यात आज पुन्हा वाढ होऊन तापमान ४५ अंशाच्या वर पोहचले आहे. सकाळी नऊ वाजल्या पासूनच उष्णता जाणवत होती. (High Temperature) रस्त्यावरून जाताना अक्षरश: उष्णतेच्या वाफा अंगाला झोंबत आहेत. यामुळे दुपारी अनेक रस्ते निर्मनुष्य झालेले पाहण्यास मिळत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Temperature
Lightning Strike : अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी; जामखेड तालुक्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

आणखी ३ दिवस उन्हाची तीव्रता 

जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या तापमानाने (Heat Wave) उच्चांक गाठला आहे. मागील दोन दिवसात तापमानात ३ अंशाने वाढ झाली असून जिल्ह्यात उष्णतेची लाट २० एप्रिलपर्यंत राहण्याचा असल्याचा अंदाज वेलनेस वेदर फाउंडेशनने व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com