Parola News : अवकाळीने केले नुकसान; कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन 

Jalgaon News : चोरवड विविध कार्यकारी सोसायटीचे सुमारे ६० हजार व हात उसनवारीचे ५० ते ६० हजार रुपये कर्ज आहे. ते कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते
Parola News
Parola NewsSaam tv

पारोळा (जळगाव) : अवकाळी पावसामुळे शेतीच्या उत्पन्नात घट झाल्याने कर्ज कसे फेडायचा; याची विवंचना लागली. यातूनच (Parola) चोरवड (ता. पारोळा) येथील शेतकऱ्याने (Farmer) विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. राजेंद्र गजमल पाटील (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

Parola News
Solapur Constituency: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रणिती शिंदेंची मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळमध्ये वाढली ताकद; जाणून घ्या राजकीय घडमाेडी

राजेंद्र पाटील यांनी १७ एप्रिलला सकाळी दहाला (Jalgaon) राहत्या घरी विषारी द्रव्य सेवन केल्याचे त्यांची सून आरती पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच दूरध्वनीवरून त्याचे पती राहुल पाटील यांना कळविले. तेव्हा राहुल पाटील यांनी तातडीने त्यांना उपचारार्थ पारोळा येथील कुटीर रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parola News
Pandharpur News : पंढरपूरच्या चैत्री यात्रेवर उष्णतेचे सावट; भाविकांची संख्या कमी, बाजारपेठेवरही परिणाम

मृत राजेंद्र पाटील यांचा मुलगा राहुल पाटील यांनी (Parola Police) पारोळा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पाटील यांच्यावर चोरवड विविध कार्यकारी सोसायटीचे सुमारे ६० हजार व हात उसनवारीचे ५० ते ६० हजार रुपये कर्ज आहे. ते कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. त्यातच यावर्षी बेमोसमी पावसाने उत्पनात घट आल्याने नैराश्येपोटी काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, चार मुली व नातवंडे असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com