Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, दोरीनं बांधून घरात डांबून ठेवलं; शरीरावर १७ ठिकाणी दिले चटके

Sambhajinagar Police: संभाजीनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी भयंकर छळ केला. या महिलेला घरात डांबून ठेवत शरीरावर चटके दिले. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

पुण्याच्या वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात हुंडाबळी आणि छळाच्या अनेक घटना समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केला. या महिलेला दोरीनं बांधून घरात डांबून ठेवलं आणि तिच्या शरीरावर १७ ठिकाणी चटके दिले. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे ही घटना घडली. विवाहितेला पैशांसाठी छळ करून असह्य वेदना देत घरात डांबून ठेवले. या महिलेला शरीरावर एक-दोन नव्हे तर तब्बल १७ ठिकाणी चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी महिलेचा नवरा अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख (रा. हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) आणि दुसरी नणंद रिजवाना ईमरान शेख, सासरे अब्दुल शेख , सासू रब्बाना शेख, दीर अजीज शेख यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित महिलेचे माहेर फुलंब्री असून तिचे संभाजीनगर तालुक्यातील चौकावाडी येथे राहणारे अजिम अब्दुल शेख यांच्याशी ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक ५ वर्षांचा मुलगा आहे.

पीडित महिलेचा नवरा अजिम शेख हा तिला पैशांची मागणी करत सतत शिवीगाळ करत मारहाण करत होता. मागील दोन वर्षांपासून सातत्याने या महिलेचा सासरच्यांकडून छळ सुरू आहे. ही महिला दररोजचा त्रास आई- वडीलांना न सांगता वेदना सहन करत राहिली. माहेरी कुणाचे तरी लग्न असल्याने या महिलेचे वडील तिला घेण्यासाठी गेले होते. यावेळी ती एका खोलीत डांबून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आली. विचारपूस केली असता तिने वडिलांना रडत रडत घडलेली आपबीती सांगितली.

या महिलेला गेल्या काही दिवसांपासून राहत्या घरात दोरीने बांधून डांबून ठेवले होते. तिच्या गळ्यावर, दोन्ही हातावर, पायावर आणि शरीराच्या अनेक भागांवर १७ ठिकाणी निर्दयीपणे चटके चटके देण्यात आलेत. या घटनेची गंभीर दखल घेत फुलंब्री पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले आहेत. पोलिस या सर्वांचा शोध घेत आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT