Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : मोठा अनर्थ टळला; वेरूळ घाटामध्ये बसचा भीषण अपघात, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराची संभाजीनगर- धुळे ही बस धुळे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बस वेरूळ घाटामध्ये असल्याने थोडी हळू चालत होती

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : चाळीस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला वेरूळ घाटामध्ये भीषण अपघात झाला. मागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने बस दरीत कोसळली असती. सुदैवाने पुढे जाऊन बस कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराची संभाजीनगर- धुळे ही बस धुळे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बस वेरूळ घाटामध्ये असल्याने थोडी हळू चालत होती. मात्र मागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे (Bus Accident) बस बाजूला असलेल्या कठड्याला ही बस जाऊन अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली आहे.

प्रवाशांमध्ये घबराट 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात एसटी बस आणि टेम्पोचा (Accident) अपघात झाला. हि बस रस्त्यावरील कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे या अपघातात बसमधील ४० प्रवासी हे थोडक्यात बचावले असून सुखरूप असल्याची माहिती आहे. दरम्यान टेम्पोने धडक दिल्याने बसमधील सर्व प्रवाशी घाबरले होते. अपघातानंतर खाली उतरल्यानंतर खोल दारी पाहून घबराट निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 16 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर शेअर केली भावुक पोस्ट

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Ring Design : अंगठ्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स; हातात घालताच प्रत्येकजण विचारेल, "कुठून घेतली?"

ठाकरे बंधूंची युती कधी होणार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला|VIDEO

Bananas for diabetic patients: डायबेटिस पेशंटनं रोज केळी खावीत आणि किती खावीत? ब्लड शुगर वाढते? सगळ्या प्रश्नांचं १ उत्तर अन् दूर होतील सगळे गैरसमज

SCROLL FOR NEXT