रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खीर्डी या ठिकाणी एका मंगल कार्यालयात गुटखा तयार करून त्याची पॅकिंग केली जात होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या मंगल कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या ठिकाणाहून काही मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील खुलताबाद परिसरातील खिर्डी येथील मंगल कार्यालयात सुगंधित अगरबत्ती बनवण्याच्या नावाखाली गुटखा पॅकिंगचे काम सुरु होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुटखाच्या कारखान्यावर पोलिसांनी (Police) छापा टाकला. दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करण्यासाठी हा साठा केला असल्याचं निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांकडून ही करवाई कऱण्यात आली आहे.
चौघांवर गुन्हा दाखल
खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिरडी येथील घटना;सुगंधित अगरबत्ती बनविण्याच्या नावाखाली गोरख धंदा सुरू होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत साधारण २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी २ वाहने आणि इतर संपूर्ण साहित्य देखील जप्त केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.