Sambhajinagar Bike-Truck Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Sambhajinagar Bike-Truck Accident: संभाजीनगरमध्ये कामावरून घरी जाणाऱ्या दोघांचा भीषण रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला. दुचाकीने उभ्या ट्रकला पाठी मागून जोरदार धडक दिली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • संभाजीनगरमध्ये भीषण रस्ते अपघात

  • उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक

  • दोन जणांचा जागीच मृत्यू

  • कामावरून घरी जात असताना हा अपघात झाला

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे ही घटना घडली. रस्त्यावर उभ्या ट्रकला पाठी मागून दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे दोघेजण निल्लोड येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, निल्लोड येथे राहणारे कैलास सखाराम मगर (४५ वर्षे) आणि संजय बारीकराव खटाळ (३५ वर्षे) यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. दोघेही माणिकनगर येथील हॉटेल गुरु बिअर अँड बारमध्ये कामाला होते. दोघेही सोमवारी रात्री उशिरा हॉटेल बंद करून निल्लोड येथील आपल्या घराच्या दिशेने जात होते. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील चिंचखेडा येथील हॉटेल प्रीतीच्या समोर भीषण अपघात झाला.

पीव्हीसी पाईपने भरलेला ट्रक प्रीती हॉटेलसमोर उभा होता. या ट्रकला कैलास यांच्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कैलास आणि संजय या दोघांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले.

ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून चालक टायरमधील हवा चेक करत होता. कैलास आणि संजय यांना ट्रक उभा असल्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्याची दुचाकी थेट ट्रकला जाऊन धडकली. या अपघातानंतर त्यांच्यावर निल्लोड गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने निल्लोड गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे या गावात दिवसभर चूल पेटली नाही. या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pathology Scam: पॅथोलॉजीत रुग्णांच्या लुटीची 'टेस्ट', लॅबच्या लुटीचा 'साम'वर भांडाफोड; पाहा VIDEO

बोक्यानं साधला मोका अन् मांजरी संग भिडवला टाका, पिल्लांच्या मालकीवरून राडा, पाहा नेमकं झालं काय?

नराधमांना मोक्का लावा, अन्यथा तीव्र आंदोलन! काँग्रेस नेत्याचा पोलीस प्रशासनाला इशारा

Maharashtra News Live Update: अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त

बोगस दाखला सहर बेपत्ता; नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, Video

SCROLL FOR NEXT