Salman Khan Saam Tv
महाराष्ट्र

Salman Khan: 'जेवढं आयुष्य आहे, तेवढं जगेल'; बिश्नोई गँगच्या धमक्यांवर सलमान पहिल्यांदाच बोलला

Salman Khan Lawrence Bishnoi Death Threats: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद काही नवीन नाही. या प्रकरणावर सलमान खान पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच बोलला आहे.

Bhagyashree Kamble

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद काही नवीन नाही. सलमानच्या मागे बिश्नोई जणू हात धुवून लागला आहे. धमकीचे कॉल, मेसेज, घराबाहेर गोळीबार अशा अनेक घटना घडल्या आहेत. राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

या घटनेनंतर चित्रपटाची शुटींगही कडक सुरक्षा बंदोबस्तात पार पडली. लवकरच सलमानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमान सध्या व्यग्र आहे. एका इव्हेंटमध्ये त्याला बिश्नोई देत असलेल्या धमक्यांवर प्रश्न विचारण्यात आला. यावर सलमानने उत्तर दिलं आहे.

सिकंदर चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी एका पत्रकाराने सलमानला प्रश्न विचारला. 'जीवे मारण्याच्या धमक्या तुला येतात. धमक्यांची तुला भीती वाटत नाही का? एकंदरीत या प्रकरणावर काय सांगशील?' या प्रश्नावर सलमानने पत्रकाराला उत्तर दिलं आहे. 'नियतीने माझ्या आयुष्यात जेवढं आयुष्य लिहिलं असेल, तेवढं असेल', असं त्याने उत्तर दिलं.

पत्रकाराच्या प्रश्नावर सलमान म्हणाला, 'सगळ्या गोष्टी देव, अल्लाह यांच्या हातात आहे. नियतीने माझ्या आयुष्यात जेवढं आयुष्य लिहिलं असेल, तेवढंच असेल. बस इतकचं. कधी - कधी जितक्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं. तितक्या अडचणीही वाढत जातात. हा नेमका इथेच प्रॉब्लेम होतो', असे त्याने उत्तर दिलं.

मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये सलमान खान सिकंदर चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी गेला होता. यावेळी त्याच्या भोवती कडक सुरक्षा होती. बिश्नोईने दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याच कारणामुळे सिकंदर चित्रपटाचं प्रोमोशन कमी प्रमाणात झालं. तसेच सलमान कमी ठिकाणी प्रोमोशनसाठी गेला होता. ३० मार्चला एआर मुरूगदोस दिग्दर्शीत सिकंदर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT